Sunday, September 26, 2010

आपलंही कुणी असावं....

ह्या खांद्यावर डोकं ठेऊन तिला रडावसं वाटावं ज्या स्वप्नांमध्ये माझ्या सगळ्या रात्री जगतात त्या स्वप्नांमध्ये हरवून तिलाही जगावंसं वाटावं.... माझे आसू पुसून तिने आमच्या सुखात हसव.. कधीतरी वाटत यार आपलंही कुणी असावं...  छोट्या छोट्या गोष्टीमध्ये खोटं खोटं चिडाव पण ... भेटीनंतर निघते म्हणताना तिचा पाऊल अडावं बाकी सगळ्या जगाचा पडेलच विसर तेव्हा... तिने माझा प्रेमात अगदी आकंठ बुडावं... ह्या छोट्याशा स्वप्नानं एकदाचं खरं व्हाव .... नेहमीचा यार वाटत..... आपलंही कुणी असावं..

2 comments:

  1. वाह! खूप छान लिहिले आहे खरच असावी
    अशी मैत्रीण
    अभिजित

    ReplyDelete
  2. गिऱ्हाईकाची दाढी करून झाल्यावर न्हाव्यानं त्याला विचारलं, "साहेब! माझा वस्तरा कसा काय काय वाटला तुम्हाला?"
    गिऱ्हाईक म्हणाले," न्हावीदादा, तुमच्य वस्तऱ्याला खरोखरच जगात तुलना नाही. तुम्ही वस्तऱ्यानं माझी दाढी करीत आहात, असं मला वाटलंच नाही."
    हे ऐकून एकदम खुषीत आलेल्या न्हाव्यानं विचारलं, "असं? मग मी तुमच्या गालांवरून वस्तरा फिरवीत असताना तुम्हाला नेमकं कसं वाटत होतं?
    गिऱ्हाईक म्हणाले, "खरं सांगायच तर, तुम्ही हाती खरखरीत पॉलिशपेपर घेऊन माझे गाल जोरात घाशीत असल्याचा मला भास होत होता."

    ReplyDelete