Tuesday, September 28, 2010

मराठी मिडियम

१. कारणे द्या - गांडुळ शेतक-याचा मित्र आहे
उ. शेतकरी शेतात एकट्याने राबतो आणि गांडुळ त्याच्याशी गप्पा मारते म्हणुन.

२. संत तुकाराम यांची थोडक्यात [३-४ ओळीत] माहिती लिहा
उ. संत तुकाराम हे संत होते. त्यांचे नाव तुकाराम होते. लोक त्यांना संत तुकाराम म्हणुन ओळखत

३. कारणे द्या - उन्हाळ्यात दिवस मोठा तर थंडीत लहान असतो.
उ. एखादी गोष्ट तापविल्याने प्रसरण पावते. उन्हांळ्यात तापमान जास्त असल्याने दिवस प्रसरण पाउन मोठा होतो, तर थंडीत त्याउलट लहान होतो.

४. खालील बाबतीत काय होईल ते सांगा.
जळत्या मेणबत्तीवर ग्लास उपडा ठेवल्यास...
उ. ग्लास काळा होईल.

५. मराठीत भाषांतर करा.
चिदियां पेडपर चहचहाती हैं |
उ. चिमण्या झाडावर चहा पितात.

Monday, September 27, 2010

मराठी पी.जे....

                                                      

चिनी कुत्र्याचे नाव काय ?                                                                   
>हे हुंग ते हुंग
भारत सोडून जाणार्‍या माणसाला काय म्हणाल ?
>हिंदुस्तान लिव्हर
नेपाळमध्ये चोर्‍या का होत नाहीत ?
>कारण तिथे सगळेच गुरखे आहेत.
रशियन डोअरकिपरचे नाव काय ?
>उभा का बस की

हिवाळ्यात खिसेकापूंच्या धंद्यात मंदी का असते ?
>कारण हिवाळ्यात सर्वांचे हात खिशात असतात


अनुपम खेरला ३१ डिसेंबरला मुलगी झाली तर तिचे नाव काय असेल ?
>वर्षा अ खेर

हत्ती पाण्यात पडला तर काय होईल ?
>ओला होईल

ब्रूस लीच्या आईचे नाव काय ?
>माऊ ली

त्याच्या मोठ्या बहिणीचे नाव काय ?
>थोर ली

लहान बहिणीचे नाव काय ?
>धाक ली

जेंव्हा घड्याळात तेरा ठोके पडतात ती वेळ कुठली असते ?
>घड्याळ दुरुस्त करण्याची !

दोन चिमण्या असतात त्यातली एक म्हणते "चिऊ" दुसरी काहीच म्हणत नाही! का?
>कारण दुसरी चिमणी Factory ची असते.

कर्वे रोडला पाणी येते, पण कोथरुड ला नाही येत. का बरे ?
>कारण वाटेत नळ स्टॉप आहे.

ढिशुम ढिशुम: एकदा भारत आणि पाकिस्तान चे सैनिक समोरासमोर येतात पण ते युद्ध करत नाहीत. का बरं?????
>कारण ढिशुम ढिशुम तर पेप्सोडेन्ट चे काम आहे ना....

रावणाच्या लंकेला "सोन्याची लंका" का म्हणतात???
कारण लहानपणी ..
>रावणाचे आई-वडिल त्याला लाडाने "सोन्या" म्हणायचे..

पुरातन काळातले हाडांचे सांगाडे सापडल्यानंतर त्यातला कोणता पुरुषाचा आहे आणि कोणता स्त्रीचा, हे पुरातत्त्वशास्त्रज्ञ कसे ठरवतात?
>दोन्ही सांगाड्यांचे जबडे पाहायचे. जो जास्त घासला गेला असेल, तो स्त्रीचा!!!!

संता कम्प्युटर कंपनीत नोकरीसाठी इंटरव्ह्यू द्यायला भटिंड्याहून प्रथमच मुंबईला आला होता. मुलाखत घेणाऱ्यांनी विचारलं, ''तुम्हाला एमएस ऑफिस माहिती आहे का?''
>संता म्हणाला, ''आप बस अड्रेस दो जी, मैं पहुंच जाऊँगा!!!!''

पप्पा कांगारू -अगं आपली बेबी कुठाय?
>मम्मा कांगारू -ओ माय गॉड! कोणी तरी माझा खिसा कापलेला दिसतोय.

नुकतीच ससा आणि कासवाची पुन्हा एकदा शर्यत झाली. आणि त्यात ससा मागे पडला. पण तरीही शर्यत ससाच जिंकला... का?
>कारण...शर्यतीला डकवर्थ लुईस नियम लागू केला होता ना.

पुणेरी पाटया

पु.लं

1) पु.लंच्या ओळखीच्या एक मुलीचे लग्न ठरले. योगायोगाने माहेरचे आणि सासरचे आडनाव एकच होते. हे कळल्यावर पु.लं. म्हणाले "बाकी काही म्हणा, पण मुलीने घराण्याचे नाव राखलं हो".
2) माहेर चा एक जुना अंक वाचताना, भारती आचरेकरांची मुलाखत वाचली. त्यात त्या म्हणतात, त्यांची आई माणिक वर्मा ह्यान्चे लग्न ठरल्याची बातमी कळल्यावर पु.लं. पटकन म्हणाले 'हिने तर वर्मावरच घाव घातला' . 
3) वसंत सबनीस हे तळवलकरांचे मित्र. एकदा ते सबनिसांच्या घरी गेले, तेव्हा तेथे पु.लं. बसलेच होते. वसंतरावांनी ओळख करून दिली, "हा मझा मित्र शरद तळवलकर" "हो का? अरे व्वा!" पु.ल म्हणाले होते, "चांगला मनुष्य दिसतो! नव्हे, हा चांगलाच असरणार!" "हे कशावरून म्हणतोस तू?" वसंतरावांनी पु.लं. ना विचारलं. "अरे, याच्या नावावरून कळतेय ते!" पु.ल. म्हणाले. याच्या नावात एकही काना, मात्रा, वेलांटी, उकार काही नाही. म्हणजे, हा माणूस सरळ असणारच!"

Sunday, September 26, 2010

आपलंही कुणी असावं....

ह्या खांद्यावर डोकं ठेऊन तिला रडावसं वाटावं ज्या स्वप्नांमध्ये माझ्या सगळ्या रात्री जगतात त्या स्वप्नांमध्ये हरवून तिलाही जगावंसं वाटावं.... माझे आसू पुसून तिने आमच्या सुखात हसव.. कधीतरी वाटत यार आपलंही कुणी असावं...  छोट्या छोट्या गोष्टीमध्ये खोटं खोटं चिडाव पण ... भेटीनंतर निघते म्हणताना तिचा पाऊल अडावं बाकी सगळ्या जगाचा पडेलच विसर तेव्हा... तिने माझा प्रेमात अगदी आकंठ बुडावं... ह्या छोट्याशा स्वप्नानं एकदाचं खरं व्हाव .... नेहमीचा यार वाटत..... आपलंही कुणी असावं..